Chhagan Bhujbal 
ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले; "सर्व जाती-धर्माची मतं..."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Published by : Naresh Shende

Chhagan Bhujbal Speech : उत्तर प्रदेशात जागा कमी होतील, असं कुणाला वाटलं होतं का? पण जागा एकदम खाली आल्या आणि तिथे इंडिया आघाडी पुढे गेली. इंडिया आघाडी यांच्यात दिशाभ्रम करण्यात यशस्वी झाले आहेत. आपण छत्रपती, शाहू-फुले आंबेडकरांचं नाव घेतो. आपणही त्याच मार्गाने जातो. ते आपल्याला कृतीतून दाखवावं लागणार आहे. जनतेला तसा विश्वास दाखवावा लागेल की, आम्ही याच मार्गाने जाणार आहोत. सर्व धर्माची, जातीची मतं आपल्यासा सोबत घ्यावी लागतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधीत करताना बोलत होते.

छगन भुजबळ आपल्या भाषणात पुढे म्हणाले, २५ वर्षांपूर्वीचा दिवस मला आठवतो. ज्या दिवशी पक्षाची स्थापना याच हॉल मध्ये झाली होती. पवार साहेबांसह अनेक नेते उपस्थित होते. हा पक्ष स्थापन करण्यासाठी एक हजार मतदारांचे अॅफेडेव्हिट हवे होते. ते सर्व आम्ही तयार केले. निशाणी ठरली तेव्हा चरखा दिला आणि समाजवादी पक्ष यात विलीन झाला. दिल्लीत काही लोकांनी ही निशाणी मिळू नये म्हणून ती फ्रीज केली. आम्ही भरपूर प्रचार केला होता. त्यानंतर घड्याळ पाठवले. त्या घड्याळाला आम्ही खाली तेंकू लावले आणि निशाणी तयार केली. संध्याकाळी शिवाजी पार्क मध्ये सभा झाली आणि स्थापना जाहीर केली. पण आज वेगळ्या पद्धतीने आपण वर्धापनदिन साजरा करत आहोत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठेचं लागकी आहे हे नाकारता येणार नाही. विकास जरूर करा.

मुंबईत ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरु केलं. एवढे पैसे खर्च केले पण मुंबईत निवडून किती आले? पियुष गोयल वायकर जवळपास ४८ मतांनी निवडून आले. महाराष्ट्रात आणि मुंबईत आपण विचार करणार नाही. आजार ओळखून औषधं ठरवले पाहिजे. विकास करायलाच पाहिजे पण आपण बोलून दुखावतो. मी पिंपळगावच्या मिटिंगमध्ये मोदी साहेबांना सांगितलं की, आपण ४०० पारचा नाराज दिला पण आपण संविधान बदलणार असा अपप्रचार केला.

त्यानंतर मोदींनी खुलासा केला पण ते किती लोकांपर्यंत पोहोचलं? संविधान बदलले म्हणजे आमचं आरक्षण जाणार,असं सगळ्यांच्या डोक्यात होतं. आपण असं काही करणार नव्हतो. पण लोकांचा समज झाला. आता विधानसभा निवडणूक आहे यात संविधानाचा विषय येत नाही. आपला जो मतदार आहे, तो सर्व समाजातील आहे, तो परत मिळवावा लागेल. दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, भटके आणि सर्वच आपल्याला परत मिळवावे लागतील, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा