ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या विमान अपघातावरून छगन भुजबळ संभ्रमात; म्हणाले…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विविध नेत्यांकडून वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी या अपघाताबाबत संभ्रम व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, “मला अजूनही समजत नाही की हे विमान तिथे नेमकं कसं उतरलं. विमानतळाची धावपट्टी मोठी असते, ती काही लहान जागा नसते. असं असतानाही हा अपघात कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विमानात तांत्रिक बिघाड होता की पायलटची चूक झाली, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.” बुधवारी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते लँडिंग स्ट्रिपलगतच्या भागात कोसळले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी विमान घसरले आणि काही क्षणांतच मोठ्या आवाजात कोसळले. अपघातानंतर सलग पाच स्फोट झाले, ज्यामुळे विमानाने पेट घेतला. काही मिनिटांतच संपूर्ण विमान आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. या भीषण दुर्घटनेत विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले असून, कुटुंबीय, समर्थक आणि नेत्यांची तेथे मोठी गर्दी जमली आहे.

दरम्यान, या घटनेवरून सुरू झालेल्या राजकीय वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “एखाद्याच्या मृत्यूवरही राजकारण केलं जातंय, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. अशा संवेदनशील प्रसंगीही काही लोक खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अजित पवार हे अत्यंत लोकप्रिय नेते होते आणि त्यांच्या निधनावर राजकारण करणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावण्यासारखे आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय म्हटले?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या अपघातावर संशय व्यक्त करत राजकीय कटाची शक्यता बोलून दाखवली. “जेव्हा राजकीय नेतेही सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबद्दल काय बोलायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयावरच विश्वास असल्याचे सांगत इतर तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, या घटनेभोवतीचे प्रश्न आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा