गेल्या काही दिसवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागा, कांदा आणि सोयाबीनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत.
अतिवृष्टीमुळे लोकांना रहायला जागा नाही, घालायला कोरडे कपडे नाहीत आणि पोटात अन्नाचा कणही नसून मोठं नुकसान झालं आहे. पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटानंतर सरकारने जतनेला दिलासा देत मदतीचे आश्वासन दिले आहे. याचपार्श्वभूमिवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
मंत्री छगन भुजबळांनी त्यांच एक महिन्याचं वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे आश्वासन केले आहे. अस्मानी संकट ओढवलेल्या नुकसानाने वेढावलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून, मुख्यमंत्री सहायता निधीस वेतन देण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. "शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य होईल ते करणार. उद्या नाशिक येवला भागातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार" असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.