लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? कोणाला आणि किती? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज का आहे?
छगन भुजबळ म्हणाले की, "निश्चितपणे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे. काही वर्ष आरक्षण दिलं म्हणजे सर्व काही संपलं नाही. आरक्षण जे आहे महात्मा ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले. "कामे वाटून द्यावे जातीच्या प्रमाणात" म्हणजेच आरक्षण.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी एकट्याने लिहिलं. त्यावेळी गरीब मागासवर्गीय दलित यांचा प्रश्न त्यांनी हाताळला, यामध्ये अनेक लहान लहान जाती आहेत. त्यामुळे आयोग निर्माण करून एक वेगळी मदत करण्याची आवश्यकता आहे. मंडल आयोग आल्यानंतर तो दहा वर्ष दाबून ठेवण्यात आला".
कोणाला किती आरक्षण?
"मराठा समाज हा खूप मोठा आहे. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, जे गरीब आहेत, शिक्षणाची गरज आहे, ते 50 टक्क्यांमध्ये जाऊ शकत नाही. मात्र, जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत ते या दहा टक्क्यांमध्ये जाऊ शकतात. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर आता ते म्हणतात मला ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे. त्या टक्क्यांपैकी 13 टक्के दलित 60 टक्के आदिवासी तीन टक्के ब्राह्मणोत्तर झाले, राहिलेल्या 23% मधील इतर आणि त्यामध्ये मराठा. माझा मराठा समाजाला विरोध नाही, त्यांना जी आर्थिक मदत पाहिजे ती द्यायचीच आहे. शैक्षणिक मदत पाहिजे ती द्यायची आहे, पण माझं म्हणणं एवढंच आहे की, या 50% मध्ये तुम्ही येऊन बसलात तर किती गर्दी होणार तुम्हाला काही भेटणार नाही. त्या गरीब भटक्या विमुक्त जातीला काही भेटणार नाही".
आरक्षण नेमकं कोणासाठी ?
"मग मला सांगा बाकीचे 50% तर कोणाला? मराठा समाजाचे जे रिटर्न आहे त्यांनी सुद्धा सांगितलं इ डब्ल्यू एस मध्ये मेडिकलला आणि आती झालेल्या एमपीएससी त्याचा कट आउट पण खाली आहे. मराठा समाजामध्ये मराठा आरक्षणामध्ये कमी आहे, ओबीसीचा कट आउट वरती आहे. तिकडे जाऊन नुकसान आहे. एका समाजाला तुम्हाला कमी कट आउट फोन असताना यामध्ये आम्हाला प्रचंड नुकसान होणार आहे. हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे मी जेव्हा हे विचारतो त्याला त्यावेळेस फाटे फुटले जातात. आर्थिक परिस्थितीनुसार आपण आरक्षण दिलं पाहिजे संविधान जर तुम्ही मानता आहात संविधान बचाव जर तुम्ही बचाव साठी प्रयत्न करतात. तर तुम्हाला हे समजायला पाहिजे आगा आरक्षण हे मागासवर्तीयांसाठी आहे".
आरक्षणाचा प्रश्न कधी पर्यंत सुटेल?
"आज तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला आरक्षण नाही. मात्र, उद्या तुम्ही गरीब झाला तर तुम्ही त्यावेळेस म्हणणार ते आरक्षण द्या. तर ही परिस्थिती उलटी सुल्टी होणार, कधीतरी कोणीतरी विचार करणार यावरती... सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय ते तुम्हाला मान्य नाही का? जर तुम्ही संविधानाला मानतात तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे आदेश देखील मान्य करावे लागतील. माझी खात्री आहे कुणबी आणि मराठा या वेगळ्या जाती आहेत सुप्रीम कोर्टानुसार मराठ्याला आरक्षण देऊ शकत. सर्वांनी सामंजसपणाने आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे असं माझं मत आहे. जे कुणबी नाही आहेत जे मराठा आहेत त्यांना आरक्षणासाठी घेण्यासाठी एक वेगळा रस्ता काढला या गोष्टीसाठी माझा विरोध आहे".