ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; कारण काय?

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत बोलताना नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

छगन भुजबळ म्हणाले होते की, आरक्षणाचं भांडण मिटावं म्हणून सह्याद्रीवर सरकारने बैठक बोलावली. सर्व प्रकरण शांत कसं होईल, सर्वांना न्याय कसा मिळेल, यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं आणि मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षा होती. पण पाच वाजता बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली.

या भेटीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची पहिल्यांदा भेट होणार आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य