Admin
ताज्या बातम्या

छगन भुजबळ यांचे मोठं विधान म्हणाले, केंद्रात ताई आणि राज्यात दादा...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत.

शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होईल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत. यावर आता खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांसारखा नेता भेटणं शक्य नाही. आम्ही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू.काही झालं नाही तर समितीला निर्णय घ्यावा लागले. राज्यात अजित पवारांनी कार्यभार पाहावा आणि देशात सुप्रिया सुळे यांनी कारभार पाहावा असे भुजबळ म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा

Pune : पुण्यात मुसळधार पाऊस; थेऊरमधील 50 घरामध्ये शिरलं पाणी

Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल पुन्हा ठप्प; महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड