ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चेवर मोठे वक्तव्य, म्हणाले...

महाराष्ट्रात राष्ट्रवादी विलिनीकरण यावर सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्रात विलिनीकरण यावर सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की या चर्चेला घाई करण्याचं काही कारण नाही आणि सर्व पक्षांनी एकत्र बसून विचार करावा लागेल.

छगन भुजबळ म्हणाले, “मला समजत नाही रोज ‘विलिनीकरण, विलिनीकरण’ अशीच चर्चा का चालू आहे? विलिनीकरण आजही करता येईल, एक महिन्याने किंवा दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचं कारण काय आहे?” त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. भुजबळ यांनी पुढे सांगितले की आतापर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि आता सर्व नेते, खासकरून दोन्ही बाजूतील कार्यकर्ते एकत्र येऊन विचार करणार आहेत. “सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री म्हणून निवडले आहे, आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसविणे हा प्राथमिक अजेंडा आहे. नंतरच विलिनीकरणाबद्दल पुढील निर्णय व्हावा,” असं त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ म्हणाले की काही आमदार विलिनीकरणाबद्दल मत व्यक्त करत आहेत, पण “मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. नवीन नेतृत्वाची वेळ द्या — ते स्वतः निर्णय घेतील.” त्यांनी सांगितले की पहिल्या दिवसापासूनच विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, त्यामुळे या घाईला अर्थ नसावाआहे की अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे आणि विविध मतभेद आणि भविष्यकालीन रणनीतींवर मत व्यक्त केली जात आहे.

छगन भुजबळ यांनी याबाबत एक महत्त्वाची बाब देखील सांगितली की सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते “बसून एकत्र चर्चा करतील आणि नंतरच निर्णय होतील”. त्यामुळे यावर घाई न करता योग्य राजकीय संवाद करून शुभेच्छा आणि धोरणे ठरविण्याची गरज असल्याचे भुजबळांचे मत आहे.याशिवाय, काही नेते आणि आमदार विलिनीकरणासंदर्भात विविध मत मांडत असले तरीही अधिकृत प्रस्ताव किंवा निर्णय अद्याप आलेले नाही, असा मुद्दाही उपस्थित झाला आहे. राजकीय समीकरणे बदलत असताना, पक्षाच्या नेतृत्व प्रक्रियेवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा