छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. राज्यभर शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंतीचा सोहळा रंगणार आहे. शिवनेरीवर मोठा उत्सव असणार आहे.
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून राज्यभरातील शिवभक्त किल्ले शिवनेरी गडावर मशाल ज्योत आणि भगवे ध्वज घेऊन दाखल झालेत.
शिवनेरी किल्यावर तसेच जुन्नर शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.