ताज्या बातम्या

जगदंबा तलवारीनंतर, छत्रपती शिवरायांची वाघनखं परत आणणार - सुधीर मुनगंटीवार

Published by : Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांविषयींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले, राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ही वाघनखं इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयात आहेत. ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न असेल. आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असे त्यांनी सांगितले.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी