हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 352 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली. गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी 9.30 वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाले.
युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर पार पडला आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झाले. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतो आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो मावळे रायगडावर हजर होते.
सकाळपासुन हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये पोवाड्यांचा नाद घुमू लागला असुन शिवस्तुतीने डफ कडाडले आहेत. राज्याभिषेकाच्या सोहळ्यामुळे जणु शिवकाल च अवतरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो मावळे रायगडावर हजर होते. सकाळपासुन हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये पोवाड्यांचा नाद घुमू लागला असुन शिवस्तुतीने डफ कडाडले आहेत. राज्याभिषेकाच्या सोहळ्यामुळे जणु शिवकाल च अवतरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमिताने जागर शौर्य भक्तीचा हा अनोखा कार्यक्रम ही गडावर होणार आहे. याशिवाय धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या उपक्रमाअंतर्गत युद्धाचे प्रात्यक्षिक ही दाखवले जाणार आहे. संध्याकाळच्या सुमारास लेझीम आणि ढोलताश्यांचा गजर ही केला जाणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा आढावा घेऊन पाचाड ते रायगड या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांचा मार्ग सुकर होणार आहे.
या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्शवभूमीवर उद्या पुंडलिक नदीच्या काठावरील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्या प्रसंगी संभाजी राजे छत्रपतीनी या गडावर केवळ पोषक च गोष्टी राहतील असं विधान केलं आहे. अतिक्रमण वाढत असताना माझा धनगर समाजाला पूर्ण पाठिंबा आहे. तसेच हजारोनी येणाऱ्या शिवभक्तांमध्ये आज वाढ होऊन लाखो भक्त आज येथे येतात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येतात हे शिवभक्तांवरचे वरचे संस्कार आहेत आणि रायगडाची काळजी घेणे ही माझी जबाबदारी असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.