Chhattisgarh  
ताज्या बातम्या

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

सुरक्षा दलाची मोठी कारवाई

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

यात 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेला मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्ण याचाही समावेश

( Chhattisgarh) छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम राबवून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला वरिष्ठ नक्षलवादी नेता मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्ण ठार झाल्याचे पुष्टी करण्यात आले आहे. ही कारवाई सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे यश मानली जात आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी या भागात ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बाळकृष्णासह 10 नक्षलवादी मारले गेले. कारवाईदरम्यान दलाने नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आणि काही तास चाललेल्या संघर्षानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला.

या मोहिमेत राज्य पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि कोब्रा बटालियनची पथके सहभागी झाली होती. बाळकृष्ण हा ओडिशा राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य असून त्याच्या नावावर हत्या, लूटमार आणि पोलिसांवरील हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. गरियाबंद जिल्हा बराच काळ नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली राहिला असून, येथे सुरक्षा दलांनी यापूर्वीही अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Noida Nikki Bhati Dowry Case : निक्की प्रकरणातील आरोपींना दिलासा नाही! निक्कीच्या पती आणि सासरच्या मंडळींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री फडणवीस उद्या यवतमाळ दौऱ्यावर

Delhi High Court Bomb Threat : "न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब" दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसर तात्काळ रिकामी तर खबरदारी म्हणून...

School Bus Accident : नागपूरमध्ये दोन स्कूल बसचा अपघात; काही विद्यार्थी जखमी