थोडक्यात
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौरा रद्द
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम
फडणवीस आता पुण्याहून जळगाव आणि धुळ्याच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी आजचा नाशिक दौरा रद्द केला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारआणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, आता या सर्व प्रमुख नेत्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे.
या दौऱ्याच्या रद्द झाल्याने नाशिकमधील नियोजित कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पुण्याहून जळगाव आणि धुळ्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या उच्चस्तरीय दौऱ्याच्या रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या नेत्यांच्या बदललेल्या कार्यक्रमांमुळे प्रशासकीय पातळीवरही काही बदल अपेक्षित आहेत.