Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde reached Baramati and met Sunetra Pawar 
ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बारामतीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत पोहोचले आणि स्व.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

Published by : Riddhi Vanne

Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde reached Baramati and met Sunetra Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर राज्यात शोककळा पसरली आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समोर येताच प्रशासन आणि राजकीय वर्तुळातील नेते घटनास्थळी पोहोचले.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत पोहोचले आणि स्व.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक तसेच कुटुंबियांच्या भावनिक आधारासाठी आपली उपस्थिती नोंदवली.

फडणवीस आणि शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. भेटीचा फोटो सोशल मीडियावरदेखील सामायिक केला गेला असून, त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या भेटीचा भावनिक प्रतिसाद दिसून येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा