शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात पहिले भव्य मंदिर उभारले आहे.भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी मंदिराचे काम पूर्ण झाले असून आज शिवजयंतीनिमित्त याचा लोकार्पण सोहळा पडला आहे.
शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्णशीला पाषाणातून घडविण्यात आली आहे. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर शिल्प चित्र साकारण्यात आले आहे. त्याखाली त्या प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे. हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.