थोडक्यात
राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी व कंत्राटदारांवर संतापले
पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा
(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल वॉररूमची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी व कंत्राटदारांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
"पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करा, वॉर रुमने सुद्धा दर तीन महिन्याने प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत."