मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. 2018नंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत.
19 तारखेला पहाटे मुख्यमंत्री मुंबईतून रवाना होणार आहेत. याआधीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी जगातलं सगळं बिझनेस लीडर आणि पॉलिटिकल लीडर एकत्र येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होते. विचारांचे आदान-प्रदान होते.
अनेक महत्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत. बिझनेस लीडरसोबत देखील ठरलेल्या आहेत. मला विश्वास आहे की, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आम्ही यशस्वी होऊ. आम्हाला विश्वास आहे.