आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली असून रविवार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज सपत्नीक पंढरपूरात दाखल होतील. मुख्यमंत्री सपत्नीक आज पहाटे 2.20 वाजता विठु-रखुमाईची शासकीय पूजा करतील. या सोहळ्यासाठी अनेक मंत्रीदेखील पंढरपुरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडीत सामील होतील. तसंच मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, आकाश फुंडकर, संजय सावकारे, राधाकृष्णा विखे पाटील, गिरीष महाजन, माणिकराव कोकाटे हे देखील पंढरपुरात असतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
मुख्यमंत्री 1.25 वाजता शासकीय विश्रामगृह येतील. तर 2.55 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री संत सावता माळी कृषी नगर येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल. पुढे 3.50 वाजता ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या निर्मल दिंडी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या चरण सेवा उपक्रमाचा तसेच राज्य महिला आयोगाच्या आरोग्य वारीचा समारोप समारंभ पार पडेल. नंतर 5.05 वाजता सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम व हरित वारी ॲपचे उद्घाटन तसेच इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण होईल. 5.20 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनचा भूमिपूजन सोहळा होईल. तसेच 5.45 वाजता पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृती पर उपक्रमाचा समारोप सोहळा पार पडेल. रविवार, ६ जुलै रोजी पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे रवाना होतील. पहाटे 2.20 वाजता आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली जाईल. तर पहाटे 4 वाजता मंदिर समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या सत्काराला उपस्थित राहून मानाच्या वारकऱ्याचा सत्कार सोहळा पार पडेल.
हेही वाचा