ताज्या बातम्या

CM Devendra Fadanvis Satara Daura : फडणवीसांच्या सातारा दौऱ्यावर डॉक्टर आत्महत्येच सावट? तरी ही फलटणमध्ये उपस्थित राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा दौरा करणार आहेत.

Published by : Prachi Nate

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा दौरा करणार आहेत. फलटणमध्ये आज रविवारी होणाऱ्या कृतज्ञता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येत आहेत.

त्याचवेळी फलटण शहर पोलिस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी सकाळी 10 वाजता फलटण येथे उपस्थित राहणार आहेत. तसेच साताऱ्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्या प्रकरणाचं सावट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आणखी एक मुख्य आरोपी गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण आला आहे. तसेच सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयीत आरोपी आता पोलिसांच्या स्वाधीन झाले असून या प्रकरणाला टर्निंग पॉईंट आला आहे. त्यामुळे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर तेथील लोक काय मागणी करतात आणि या आरोपींच्या अटकेवर फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा