ताज्या बातम्या

मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Published by : shweta walge

1. सन २००४ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचं पण त्याचा जुगाड लागत नव्हता.

2. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एका बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या बद्दल दोन शब्द चांगले बोलले तेव्हा लगेच दिघे साहेबांचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले.

3. कोणावरही अन्याय न करता कुणाकडूनही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण सरकार देणार म्हणजे देणार.

4. बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हिंदूत्वाची गद्दारी तुम्ही केलीय. खुर्चीसाठी तुम्ही किती गद्दारी केलीय.

5. शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करीन म्हणणारे बाळासाहेब आणि आता कदाचित उरली सुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको.

6. निवडणूक आयोगाने शिवसेना आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकमधील 50 कोटी रुपये मागितले.. पण बँकने नकार दिला. मी 50 कोटी रुपये द्यायला लावले. खोके त्यांना पुरत नाही... त्यांना कंटेनर हवा. मी साक्षीदार आहे.

7. तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठया खाल्ल्या ते सांगा.  तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती.  बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा.

8. काल सुद्धा आणि आज सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि उद्या सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.

9. भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण हे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना आहे.

10. जोपर्यंत ही जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला कोणत्याही पदाची चिंता नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?