ताज्या बातम्या

मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला; भेटी मागचं कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबासहीत त्यांची भेट घेतली.

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबासहीत त्यांची भेट घेतली. ही भेट जवळपास दोन ते सव्वादोन तासांची होती. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पंतप्रधानांनी भेटीसाठी जास्त वेळ दिला होता. त्यासाठी त्यांचे आभार. चांगली चर्चा भेटीदरम्यान झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब यावेळी माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या.

पुढे ते म्हणाले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची माझ्या कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी वेळ दिला आणि चांगल्या निवांत गप्पा झाल्या असे शिंदे यांनी म्हणाले.

दरम्यान या भेटीत पंतप्रधानांना इर्शाळवाडी दरड दुर्घटना, राज्यातील पावसाची स्थिती, रखडलेले प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधांनांनी रडखडेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत मुंबईतील धारावी प्रकल्पावरही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा