ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी राज्यामध्ये सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत.

Published by : Varsha Bhasmare

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी राज्यामध्ये सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी 145 कोटींचा ड्रग्जचा साठा साताऱ्यातील (Stara Crime News) महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात सापडला होता. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. गृहमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन आणि कौतुक केले. ते म्हणाले की, “ ड्रग्जचा इतका मोठा साठासाताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. पूर्ण चौकशी आम्ही याप्रकरणाची करत आहोत,” देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या अंमली पदार्थांच्या प्रकरणात राजकीयदृष्टया आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगतानाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात शिंदे यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.

त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. अटक वॉरंट सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना जारी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका वर्षात राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची विकेट गेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. कोकाटे यांच्या आमदारकीचा यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा, अटक वॉरंट याबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा