ताज्या बातम्या

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा फोन...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला.

Published by : Team Lokshahi

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याबाबत माहिती दिली आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्र्यांनी फोनवरून विचारपूस केल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकार सकारात्मक असून उपोषण सोडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. मंत्री गिरीष महाजन भेटायला येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मार्ग निघाला नाही तर उपोषणावर ठाम असल्याचं दोडतले यांनी म्हटलंय. तर सुरेश बडगर आणि अण्णासाहेब रूपनर यांच्यावर उपोषण स्थळीच उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी चौंडीतील आंदोलकांना फोन केला. शिंदेंनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BJP Mumbai President : मोठी बातमी! अमित साटम यांच्याकडे नव्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा

Latest Marathi News Update live : मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड

Pune Sinhagad News : सिंहगडवरील बेपत्ता तरुण अखेर सापडला! पाच दिवसांच्या शोधमोहीमेला यश; मात्र...

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ची जोरदार सुरुवात; पाहा घरातील 16 स्पर्धकांची यादी!