डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीन यांचे आकर्षण केवळ प्रौढांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर लहानग्यांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. अनेक पालकांना सध्या मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइमबद्दल चिंता वाटू लागली आहे. अशीच एक समस्या दिल्लीतील एका पालकाने मांडली आहे.
स्क्रीन टाइममुळे होणारे परिणाम
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, लहान वयात वाढता स्क्रीन टाइम खालील समस्या निर्माण करू शकतो:
निद्रानाश व नैराश्य
लठ्ठपणा आणि मायोपिया
स्मरणशक्ती कमी होणे
रागीटपणा, हट्टीपणा
सामाजिक कौशल्यात घट
अभ्यासात रस न वाटणे
पालकांनी स्वतःला विचारावेत हे ५ प्रश्न
1. मी मुलांसोबत पुरेसा वेळ घालवतो का?
2. मी स्वतः मोबाईलमध्ये अडकून तर नाही ना?
3. मी स्क्रीन टाइमच्या दुष्परिणामांबद्दल मुलांशी संवाद साधतो का?
4. मी त्यांना पर्यायी क्रियाकलाप पुरवतो का?
5. मी स्वतः एक चांगले उदाहरण ठेवलंय का?
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी ११ प्रभावी उपाय
1. लहान वयातच मोबाईलपासून दूर ठेवा.
2. स्वतःचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा.
3. मोबाईल असे ठिकाणी ठेवा जिथे मूल सहज पोहोचू शकत नाही.
4. मोठ्या मुलांशी संवाद साधून स्क्रीनचे तोटे समजावून सांगा.
5. मूल कोणता कंटेंट पाहतो यावर लक्ष ठेवा.
6. डिव्हाइसेसवर चाइल्ड लॉक लावा.
7. मोबाईल वापरासाठी टायमर सेट करा.
8. मुलांसोबत खेळायला नियमित वेळ द्या.
9. अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या.
10. संपूर्ण कुटुंबासोबत जेवण करा; मोबाईल बाजूला ठेवा.
11. बेडरूम आणि अभ्यासिका ‘स्क्रीन-फ्री झोन’ बनवा.