ताज्या बातम्या

China Airplane Fire : चीनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग! विमान हवेत असताना अचानक पेट घेतला; तर सर्व प्रवासी....

हांग्झोहून इंचॉनला जाणाऱ्या फ्लाइट CA139 एअर चायनाच्या विमानाला हवेत असताना आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

Published by : Prachi Nate

हांग्झोहून इंचॉनला जाणाऱ्या फ्लाइट CA139 एअर चायनाच्या विमानाला हवेत असताना आग लागली. एअर चायनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9.47 वाजता विमानाने उड्डाण केले आणि दुपारी 12.20 वाजता इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते.

हा विमान हवेत असताना एका प्रवाशाच्या हँडबॅगमधील लिथियम बॅटरीने अचानक पेट घेतला ज्यामुळे विमानाचे शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

यावेळी क्रू मेंबर्सने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. एअर चायनाने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा