पूर्व आशियाचा समुद्र तापू लागला आहे... चिनीने लहानसा शेजारी देश तैवानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली... अमेरिकेतील संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर राजकीय पारा वाढू लागला आहे... युद्धाचे ढग जमू लागले आहेत... तैवानने आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकन शस्त्रास्त्रांचे 1.34 लाख कोटींचे शस्त्रागार सज्ज ठेवले आहे...
चीनला उत्तर देण्यासाठी तैवाान तयार आहे. तैवानने जुलैमध्येच अमेरिकेशी 855 कोटी रुपयांचा सौदा केला. तैवानकडे घातक शस्त्रे आहेत. शेंग-फेंग-3 हे सुपरसॉनिक अँटिशिप मिसाइल तैवानचे मोठे संरक्षण कवच आहे. तैवानकडे गेमचेंजर हिमार क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे कवच आहे. पॅट्रियट क्षेपणास्त्रांची संख्याही मोठी आहे. चीनच्या हवाई हल्ल्याचा बिमोड करण्याची तैवानकडे क्षमता आहे.
तैवानला आधीपासूनच अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांची मदत मिळते. 1954 नंतर अमेरिकेने तैवानला 54 लाख कोटी रुपयांचा शस्त्रास्त्र पुरवठा केला आहे. जर्मनी, फ्रान्समधून 15 लाख कोटी रुपयांची शस्त्रे मिळाली. चीन-तैवान युद्ध झाल्यास अमेरिकेची तैवानला मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर चीन अडचणीत येईल.
चीन-तैवान युद्ध झाल्यास भारतासह जगावर परिणाम होणार आहे. तैवान सेमीकंडक्टरच्या बाबतीत प्रचंड दबदबा आहे. जागतिक मार्केटमधील जवळपास 63% मागणी तैवानच पूर्ण करते. इलेक्ट्रॉनिक्स, कॉप्युटर्स, स्मार्टफोन, कारच्या सेन्सर्समध्येही मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. जगभरातल्या गाड्यांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. त्याचा परिणाम भारतासह जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रावर होईल...