चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवार घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
यानंतर आता राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल कलाटे हे नाना काटे यांच्यापेक्षा ताकदीचे उमेदवारी ठरले असते. कारण मागील विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मतं मिळवली होती. राहुल कलाटे पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहेत.
नाना काटे आणि राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचं नाव जाहीर करणार अशी माहिती सुरुवातीला सूत्रांनी दिली होती मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव घोषित करण्यात आल्याने राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 11:30 वाजता मोठी रॅली काढून समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.