ताज्या बातम्या

'स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा शो म्हणजे...'; चित्रा वाघ यांचा House Arrest ला कडाडून विरोध

भाजप नेत्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी हाऊस अरेस्ट शोवर बंदी घालण्याची मागणी केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला केली आहे.

Published by : Rashmi Mane

भाजप नेत्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी हाऊस अरेस्ट शोवर बंदी घालण्याची मागणी केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!, अशा कडक शब्दात त्यांनी या शोवर टीका केली आहे. वादग्रस्त अभिनेता एजाज खानचा हाऊस अरेस्ट हा शो उल्लू अॅपवर येणार असून त्याचे क्लिप्स सध्या सोशल मीडिायवर व्हायरल होत आहेत. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक्स पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”

एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला.

“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे.

असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे.

मी माहिती व प्रसारण मंत्री

@AshwiniVaishnaw

जी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी. “हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे!”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन