ताज्या बातम्या

"फरक स्पष्ट आहे..."; चित्रा वाघ यांनी सांगितला उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमधला 'हा' फरक

किरीट सोमय्यांनंतर आता चित्रा वाघ यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Published by : Sudhir Kakde

राज्यात मागच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांपासूनच शिवसेनेमध्ये अस्वस्थतेच्या, नाराजीच्या लाटा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर या लाटा एवढ्या तीव्र झाल्या की, यामुळे शिवसेना (Shiv Sena) फुटली आणि परिणामी महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकारच कोसळलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती पटली नाही, उद्धव ठाकरे वेळ देत नाही, त्यांच्या आजुबाजूची लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही अशी अनेकल कारणं देत शिवसेनेतले तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत पक्षाबाहेर पडले अन् भाजपसोबत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. त्यानंतर आता राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकार अस्तित्वात आलं. त्यामुळे आता भाजप समर्थक शिवसेनेची निशाणा साधताना दिसत आहे. किरीट सोमय्या, नितेश राणे आणि आता चित्रा वाघ यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी एका ट्विटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवत चित्रा वाघ यांनी दोघांमधला फरक स्पष्ट असल्याचं सांगितलं आहे. "मी माझं मला...आम्ही आमचं आम्हाला... फरक स्पष्ट आहे..." असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. यापूर्वी शिवसेनेवर आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या शिवसेनेशीच बंडखोरी करुन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले होते. त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत "मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हाटवल्याबदल अभिनंदन केलं" असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द