ताज्या बातम्या

क्लोरीन वायू गळतीमुळे भोपाळमध्ये खळबळ! लोकांना श्वास घेण्यास त्रास; 3 जण रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका वसाहतीत क्लोरीन वायूच्या गळतीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यात जळजळ झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका वसाहतीत क्लोरीन वायूच्या गळतीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यात जळजळ झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक झालेल्या या 'गॅस गळती'ची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. श्वास घेण्यास अधिक त्रास होत असलेल्या 3 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

भोपाळच्या मदर इंडिया कॉलनी वस्तीमध्ये बुधवारी रात्री अचानक क्लोरीन वायू गळतीची घटना घडली. यामळे डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वस्तीतील जवळपास सर्वच लोक घराबाहेर पडले. या प्रकाराची परिसरातील नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली आणि काही वेळातच महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. भोपाळचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तही घटनास्थळी पोहोचले आहेत.

प्राथमिक तपासणीनंतर वस्तीजवळ बांधलेल्या वॉटर फिल्टर प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. या प्लांटमध्ये बसवलेल्या सुमारे 900 किलो वजनाच्या सिलिंडरचे नोजल खराब झाल्याने सिलिंडरमधून गॅस गळती होत होती. ही गॅस गळती थांबवण्यासाठी महापालिकेच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने गॅस सिलिंडर पाण्यात टाकला आहे. यानंतर 5 किलो कॉस्टिक सोडा टाकून गॅस गळती बंद करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे तीन जणांना श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर खबरदारी घेत प्रशासनाने आज बाधित भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे.

भोपाळमधील गॅस गळतीच्या घटनेवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, पीडितांच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था सरकारने करावी. या प्रकरणाची चौकशी करावी व सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सुमारे 38 वर्षांपूर्वी झालेल्या गॅस गळतीच्या घटनेमुळे भोपाळमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. खरं तर, 2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री अमेरिकन कंपनी युनियन कार्बाइड फॅक्टरीमध्ये असलेल्या सर्व गॅस टाक्यांपैकी 610 क्रमांकाच्या टाकीमधून मिथाइल आयसोसायनेट गॅसची गळती झाली होती. या दुर्घटनेच्या घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा