Wardha Team Lokshahi
ताज्या बातम्या

वर्ध्यात चोरडिया कॉटन इंडस्ट्रीस कापसाच्या जिनिंगला आग एक कोटीचे नुकसान

शॉर्टसर्किट ने आग लागल्याचा अंदाज;पंधराशे क्विंटल कापूस जळाल्याने मोठं नुकसान

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील जाम ते वरोरा मार्गवरील गणेशपुर नंदोरी एथिओ चोरडिया कॉटन इंडस्ट्रीसमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक कापसाच्या गंजीतून धूराचे लोळ दिसताच आग विझविण्यासाठी धावपळ सुरू झाली, बघता बघता कापसाने भरलेले वाहनातील कापसाला आग लागली. वाहन क्र. एपी 01 टीए 0508 या वाहनात भरून असलेला कापूस खाली करण्यासाठी उभा करण्यात आले होते. त्यातील कापसाने पेट घेतला असता त्यातील कापसावर पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला.तातडीने या वाहनातील काही कापूस खाली करण्यात आले.जिनिंग मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपरिषदची अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले.सध्या आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.जिनिंग मध्ये आतापर्यंत खरेदी केलेला कापूस जळल्याचे सांगण्यात आले.अंदाजे पंधराशे ते दोन हजार क्विंटल कापूस जळल्याचे जिनिंग मालक सोहेल यांच्याकडून सांगण्यात आले.या आगीत अनुचित घटना घडली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा प्रयत्न अग्निशमन दलाकडून केला जात आहे.सायंकाळ पर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता.या घटनेची चौकशी समुद्रपूर पोलीस करीत आहे.

आगीत एक कोटीचे नुकसान!

चोरडिया कॉटन जिनिंगला आज दुपारच्या सुमारास आग लागली या आगीत पंधराशे ते दोन हजार क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून एक कोटी च नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्टता!

जिनिंग मध्ये लागलेल्या आगीचे कारण आद्यपही कळू शकले नसून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहे.जिनिंग मालकाकडून ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री