राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे सध्या नाशिकमधील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकरणांमुळे धनंजय मुंडे चर्चेत राहिले आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखे हत्येप्रकरणात त्यांच नाव घेतलं जात आहे. तर करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंवर विविध आरोप करून सळो की पळो करून सोडले आहेत. या प्रकरणांमध्येच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीत असलेल्या धनंजय मुंडेंबाबत आता त्यांची बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी योग्य पर्याय निवडला, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले असून याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे. आता मन:शांती होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.