ताज्या बातम्या

नामांतरानंतर नागरिकांचा जल्लोष; उस्मानाबादेत शिवसेना आणि शिंदे समर्थक आमने-सामने

CM Uddhav thackeray यांच्या बैठकीनंतर Aurngabad आणि Osmanabad शहरांमध्ये नागरिकांचा एकच जल्लोष

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बालाजी सुरवसे | उस्मानाबाद : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीमुळे ठाकरे सरकार सत्ता गेल्यात जमा झाली आहे. त्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक घेऊन अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्यात आले. यानंतर दोन्ही शहरांमध्ये नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे. परंतु, यावेळी शिवसेनेना आणि इतर एक गट आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक दिवसांपासून स्थानिक नागरीकांची असलेली मागणी आज अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. तसेच, एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी याच चौकात इतर काही तरूणांचा गट एकत्र येत धाराशिव नामांतराचा आनंदोत्सव करत होते. दरम्यान, त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मुनकीन है भाई मुनकीन है एकनाथ शिंदे मुनकीन है, अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, हे तरुण घोषणबाजी करत असताना पोलिसांनी मध्यस्थी करत अशा घोषणा न देण्याची सूचना केली.

दरम्यान, ठाकरे सरकारची उद्या बहुमताची परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जात आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज 9 वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा