ताज्या बातम्या

Badlapur politics : बदलापुरात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राडा

बदलापुरातील प्रभाग क्रमांक एक शांतीनगर भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केलाय

Published by : Varsha Bhasmare

बदलापुरातील प्रभाग क्रमांक एक शांतीनगर भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केलाय,या प्रभागातील माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील यांच्या सांगण्यावरून हे पैसे वाटप केले जात असल्याचं शिंदे गटाचे म्हणणे आहे .

शांतीनगर भागात अजित पवार गटाच्या काही महिला मतदारांना दारोदारी जाऊन एका खाकी पाकीटात तीन हजार रुपये देत असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि उमेदवार तुकाराम म्हात्रे यांना मिळाली,त्यानुसार तुकाराम म्हात्रे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहचले आणि त्यावेळेस राष्ट्रवादीच्या त्या महिला मतदारांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचे म्हात्रे यांचं म्हणणं आहे,आपण त्यानंतर लगेचच निवडणूक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली,निवडणूक अधिकारी तिथे आले मात्र त्यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केला नसल्याचा आरोप तुकाराम म्हात्रे यांनी केला.

दरम्यान या सगळ्या गोंधळात प्रभाकर पाटील आणि त्यांची काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यानं दोन्हीही गट आमने-सामने आले आणि त्यांच्यात वादविवाद होत मोठा राडा झाला,दरम्यान तुकाराम म्हात्रे यांनी या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची मागणी केलीय,प्रभाकर पाटील यांनी शिंदे गटाचे सगळे आरोप फेटाळले असून मला बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा