कथित INS विक्रांत घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना अखेर क्लीन चीट मिळालीये.आयएनएस विक्रांतच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली 57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या दोघांना क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांनी केला सी (क्लोजर) समरी रिपोर्ट किल्ला कोर्टात सादर करण्यात आलं आहे. पहिला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्यांदा मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर केलं आहे.सोमय्या आणि त्यांच्या मुलाने निधीचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचा पोलिसांचा दावा.