ताज्या बातम्या

चंद्रपुरातही स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात; उपक्रमात नागरिक- सामाजिक संस्था झाल्या सहभागी

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे, चंद्रपूर

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु करण्यात येणार आहे.

17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान "स्वच्छता ही सेवा" पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित "स्वच्छता ही सेवा" पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातही स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या उपक्रमात नागरिक- सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. शहरातील जटपुरा गेट येथून या स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.

चंद्रपूरच्या रामाळा तलावापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गर्दीची ठिकाणे, बगीचे, सार्वजनिक जागा अशा क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती निश्चित, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची 'दशावतार' चित्रपटाला प्रशंसा, कोकणाची व्यथा महाराष्ट्राच्या मनात

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन