ताज्या बातम्या

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवडा; गिरगाव चौपाटीवरून सुरू होणार मोहीम

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात आजपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. गिरगाव चौपाटीवरून ही मोहीम सुरु होणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरु करण्यात येणार आहे.

17 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान "स्वच्छता ही सेवा" पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे.

'स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत आज सकाळी 7 वाजता गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माननीय मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

सकाळी 7 वाजता गिरगाव चौपाटीवरून ही मोहीम सुरू होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित "स्वच्छता ही सेवा" पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा