ताज्या बातम्या

Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! 60 हून अधिक जण बेपत्ता, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या हर्षिल भागात सोमवारी रात्री भीषण ढगफुटी झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याची माहिती आहे.

Published by : Team Lokshahi

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हर्षिल भागात सोमवारी रात्री उशिरा भीषण ढगफुटी झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे खीर गाड नाल्याचा जलप्रवाह अचानक वाढला आणि काही सेकंदांतच संपूर्ण परिसरात पाणी आणि मलब्याचा प्रवाह पसरला. या घटनेत सुमारे 60 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तर 12 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. परिसरात अनेक घरांना आणि दुकांनांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही हॉटेल्समध्येही पाणी शिरल्याचे दृश्ये समोर आली आहेत.

ढगफुटीमुळे खीर गाड नाल्याचा जलस्तर अचानक वाढल्याने धराली गावात मोठ्या प्रमाणात माती आणि खडकांचा मलबा घरांवर कोसळला. यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. या आपत्तीनंतर जिल्हा प्रशासन, पोलिस, SDRF आणि लष्कराचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला जात आहे. भटवाडी येथून आणखी मदत पथके रवाना करण्यात आली आहेत.

उत्तरकाशी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्यांनी त्वरित सुरक्षित स्थळी हलवावे आणि नद्यांच्या जवळ जाणे टाळावे, अशी विनंती करण्यात आली आहे. लहान मुले, वृद्ध आणि पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये केवळ 20 सेकंदात संपूर्ण परिसर कसा पाण्याखाली जातो हे पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये नागरिकांची घबराट, ओरड आणि सैरावैरा धावपळही स्पष्टपणे दिसून येते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा