थोडक्यात
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी
इमारत कोसळल्यामुळे मोठा प्रमाणात ढिगारा साचला
दोघांना वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू
(Chamoli Nandanagar cloudburst) उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून ढगफुटीची घटना घडली आहे. रात्री उशिरा नंदा नगर येथे ही घटना घडली. इमारत कोसळल्यामुळे मोठा प्रमाणात ढिगारा साचला असून ढिगाऱ्यातून दोघांना वाचवण्यात यश आले असले तरी,5 जण बेपत्ता असून सध्या शोध मोहीम सुरू आहे.
हवामान परिस्थितीमुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळा येत असून ढगफुटीमुळे अनेक लोक त्यांच्या घरात अडकले आहेत. एक वैद्यकीय पथक आणि तीन रुग्णवाहिका बाधित भागात पाठवल्या असल्याची माहिती मिळत असून हवामान विभागाने चमोलीमध्ये आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आता सुद्धा मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. चमोली येथील ढगफुटीची माहिती मिळताच तातडीनं वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झालं. बचावकार्यास वेग आला असून नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.