ताज्या बातम्या

सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान यावर आता सारकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता सर्वांनाच कळला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यामध्ये कैद करण्यात आले होते. याची माहिती 'छावा' चित्रपटामुळे सगळ्यांनाच कळल्यामुळे आता अनेक इतिहासप्रेमी तसेच पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. मात्र या वाड्याची आता पडझड झाली आहे. दरम्यान यावर आता सारकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिवसृष्टीबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना सरदेसाई वाड्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यामध्ये भव्य स्मारक उभारणार असल्याचे सांगितले आहे. संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा छोटा आहे. तिथे फार जागा नाही. त्यामुळे सरदेसाई वाड्याच्या आजूबाजाला असलेली १०० एकर जागा अधिग्रहीत करून तिथे भव्य असे स्मारक उभारले जावे, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रसाद लाड या चर्चेदरम्यान केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी