सध्या बीड जिल्हा खूप चर्चेत आहे. शिरूर तालुक्यातील मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या घरावरदेखील प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बोक्या असो, खोक्या असो नाहीतर ठोक्या असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार". सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर आणि जवळचा कार्यकर्ता समजला जातो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आपण कोणालाही सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.