ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Nagpur : समाजकंटकांवर फडणवीसांचा रोष! "पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून काढू... "

नागपुर हिंसाचार प्रकरणात सीएम देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा! पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही, कबरीतून काढून कारवाई करू.

Published by : Prachi Nate

गेले काही दिवस नागपुर हिंसाचाराने पेटलेलं पाहायला मिळत आहे. दोन गटातील वादाने नागपुरमधील शांततेला नुकसान पोहचवले आहे. 17 मार्च रोजी नागपुरमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये काही नागरिक आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. तसेच अग्निशान दलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. तर नागपूर हिंसाचार प्रकरणात महाल परिसरातून काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंसाचार झाला त्या दिवशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या घरासमोर मोठा जमाव होता.

त्यामुळे पोलिसांकडून एका आरोपींला ताब्यात घेऊन त्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजच्या DVR जप्त देखील केला आहे. नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे आलं, ज्याच नाव फहीम शमीम खान असं आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घडलेल्या प्रकरणावर अनेक राजकीय पडसाद पडताना दिसत आहेत. आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढले आणि त्यांच्यावर भाष्य केलं. नागपूर हिंसाचारा दरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याचपार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीस सभेत संतापले आहेत.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही... - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूर प्रकरणात सीपी व मी वेगळे बोललो नाही. सीपी मला ब्रिफ करतात. नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरींतून बाहेर शोधून काढू. इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी नाही. नागपूर शांत आहे. ते नेहमी शांत असते. नागपुरमध्ये झालेली हिंसाचार ही कोणत्या गटाने नाही तर काही लोकांनी जाणीवपूर्वक हे केले".

"औरंगजेबाची कबर जाळली, पण त्यावर कोणतीही आयात नव्हती. त्याच आम्ही व्हेरिफिकेशन केल, तरीही जाणीवपूर्वक आयात जाळली असे जाणीवपूर्वक मेसेज व्हायरल केले. त्यामुळे पुढची जी घटना आहे ती घडलेली आहे. जे लोक जाणीवपुर्वक असे मेसेज व्हयरल करतात अफवा पसरवतात त्यांच्यावर देखील कारवाई केली आहे. त्यामुळे या संदर्भात कडक कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही", असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दंगल निर्माण करणाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."