मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ते दोघे एकत्र आले, तर आनंदच आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र असतील, तर वाईट वाटण्याच कारण नाही, ऑफर देणारे ते, रिस्पाँड करणारे ते, अटी घालणारे ते, शर्ती देणारे ते, मी काय बोलणारं', असे मुख्यमंत्री म्हणाले.