संपूर्ण भारतीय सैन्याच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान पाठीशी आहेत. त्यामुळे फक्त गावातच नाही तर, मोठ्या शहरात प्रत्येक व्यक्ती ही सैन्याच्या पाठीशी उभी आहे. हे दर्शवण्यासाठी आज नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थितीत होते. यावेळी फडणवीसांनी पाकड्याला चांगलेच खड्डेबोल सुनावले आहेत.
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र उद्धवस्त केली. मसूद अजरच्या कुटुंबातील 14 जण त्याठिकाणी यमसदनी पाठवले. पाकिस्तानच्या 600 ड्रोन हल्ल्याला भारतीय सैनेने मू तोड जबाब दिला. आपल्या डिफेन्स कॅपॅबिलिटीची मागणी जग करत आहे. स्वतःच देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्वात अद्यावत शस्त्रास्त्र हे भारताकडे आहे जगाला कळलं आहे. ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानचे एअर बेसेसेची तोडफोड करुन टाकली. आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तान पेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानी गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केला.