Eknath Shinde Lokshahi
ताज्या बातम्या

CM एकनाथ शिंदेंनी कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरचं केलं अभिनंदन, म्हणाले; "आपल्या देशात ऑलिम्पिकचं आयोजन..."

महिलांच्या १० मिटर एयर रायफल गटात मनू भाकरने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. या ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिलं मेडल जिंकून मानाचा तुरा रोवला आहे.

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde Press Conference : भारताची नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. महिलांच्या १० मिटर एयर रायफल गटात मनू भाकरने भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. या ऑलिम्पिकमध्ये भारतानं पहिलं मेडल जिंकून मानाचा तुरा रोवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मनू भाकरने कांस्य पदक जिकलं आहे, तिचं मी मनापासून अभिनंदन करतो. प्रधानमंत्री मोदींचंही स्वप्नही आहे की, आपल्या देशातील खेळाडूंना ऑलिम्पिक मेडल मिळालं पाहिजे. देशाला पहिलं मेडल मिळालं आहे. त्यामुळे मी मनू भाकर यांचं राज्य सरकारच्या वतीनं अभिनंदन करतो. ऑलिम्पिक २०३६ ची तयारी सुरु केली आहे. आपल्या देशात ऑलिम्पिकचं आयोजन व्हावं, असं मोदींचं स्वप्न आहे.

तसच मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांबाबतही पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. ते म्हणाले, महापालिकांचे सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांना रांगेत उभं राहावं लागू नये, यासाठी वेगळा विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका त्यांच्यासाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला देणार आहोत.

विविध योजनांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेऊ. जेणेकरून त्यांना वाटेल आमचीही समाजाला गरज आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळही स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणार आहोत. तसच त्यांच्या नवीन योजना देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांसाठीही आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. दिव्यांगांबद्दल ज्या अडचणी होत्या, जे प्रश्न होते, त्यांनाही न्याय देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यासाठीही विविध योजना आपल्या सरकारने सुरु केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा