CM Eknath Shinde  Lokshahi
ताज्या बातम्या

"लाडकी बहीण योजना सुरु केल्यावर सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं..." CM एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

"सरकार म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांचं वीजबील माफ योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी पैशांची तरतूद आम्ही केली आहे"

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde Press Conference : सरकार म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्ण योजना, शेतकऱ्यांचं वीजबील माफ योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी पैशांची तरतूद आम्ही केली आहे. कोण अधिकारी काय बोलतो, याची आम्ही माहिती घेऊच. ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात, शेतकऱ्यांना आणि युवकांना त्याचा लाभ देण्याचं काम सरकार करेनं. लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली, त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं. त्यांना कळेनासं झालं आता काय कारायचं? म्हणून मी लाडक्या भावासाठीही योजना सुरु केली, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी गेलं. दुकानांमध्येही पाणी गेलं. आता पाऊस ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आणि चिखल पाहायला मिळाला. त्यामुळे कोणतीही रोगराई होऊ नये, यासाठी मी तात्काळ पुणे जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त या सर्वांनाच निर्देश दिले आहेत की, सर्व टीमकडून लोकांना मदत करा. तसच बीवीजी आणि सुमित एन्टरप्राईजच्या जवळपास हजार लोकांनाही मदतीसाठी सूचना दिल्या आहेत. जेणेकरून नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावरील चिखलाचे साम्राज्य दूर करता येईल आणि नागरिकांचं जीवन पूर्ववत होईल.

मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी आढावा घेतला आणि तशाप्रकारे सूचना दिल्या आहेत. गणपतीपूर्वी हे रस्ते चांगले झाले पाहिजेत. कोकणात जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, त्यांना दिलासा मिळावा यासाठी मी स्वत: बैठक घेतली. मी त्यांच्या कामाचा आढावा सातत्याने घेत राहील. गोविंदा थरारक थर लावतात. त्यामध्ये काही गोविंदा जखमी होतात. दुर्देवाने काही लोकांचा मृत्यू होतो. म्हणून शासनाने गेल्यावर्षी विमा कवच देण्याचं ठरवलं. त्या प्रमाणे ती पॉलीसी आम्ही लागू केली.

जेव्हढे रस्ते आहेत, हे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत, वाहतूकदारांना आणि प्रवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात. प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतर संबंधीत मंत्री या बैठकीत असतात. महाराष्ट्रात आपण ज्या योजना केल्या आहेत आणि ज्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यासाठी मी या बैठकीत भूमिका घेईल, असंही शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा