राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली.
यादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, मविआच्या काळात जी काम होती ती काम आम्ही आमचं सरकार आलं तेव्हा पुर्ण केली आणि त्याची प्रतिबींब आपण पाहतो आहे. कल्याणकारी योजना आणि विकास यांची सांगड आम्ही घातली. त्यामुळे हा विजय जनतेचा विजय आहे असं मला मोठ्या प्रमाणावर वाटत आहे. या निवडणुकीमध्ये एक साध्या कार्यकर्त्या प्रमाणे काम केले आहे. मी काल ही एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही मी एक साध्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत राहणार.
मी कॉमन मॅन, स्वत:ला कधीच सीएम समजलो नाही- एकनाथ शिंदे
मी स्वतःला कधीच एक मुख्यमंत्री म्हणून पाहिलं नाही मी नेहमी कॉमन मॅन म्हणून राहिलो. मुख्यमंत्री म्हणजे एक कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि याच माझ्या धारणेमुळे मला कधीच कॉमन मॅनमध्ये जाताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. कारण मी सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना काय असतात हे मी समजू शकतो.
मी माझ्या कुटुंबाच्या व्यथा देखील मांडल्या होत्या माझी आई आणि माझी पत्नी ज्याप्रकारे घरात काटकसर करून घर चालवायच्या त्यावेळेस मी असा निर्धार केला की, ज्यावेळेस माझ्याकडे एखाद असं पद येईल त्यावेळेस मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील यासगळ्यांसाठी मी काही ना काही करणार.