Eknath Shinde  Team Lokshahi
ताज्या बातम्या

CM Shinde appeals: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबईत वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालणारी पोस्ट लिहिली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर राज्यात महायुती सत्तास्थापन कधी करणार याकडे लक्ष वेधलं आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबईत वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालणारी पोस्ट लिहिली आहे.

भाजपने निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेतील नेते आग्रही आहेत. तसेच अजित पवार यांनी ५ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर आता तर मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडते का यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रही आहेत.

थोडक्यात

  • 'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत एकत्र येऊ नये'

  • मुख्यमंत्री शिंदेंचं समर्थकांना ट्विट करत आवाहन

  • माझ्या समर्थनासाठी मुंबईत कुणी एकत्र येऊ नये-शिंदे

  • समर्थ महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती, आहे आणि यापुढेही राणार-शिंदे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट द्वारे काय आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना काय आवाहन केलं आहे. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.

पाहुयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय