ताज्या बातम्या

मी छोटं आव्हान स्वीकारत नाही; CM एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने ठाण्यात लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी या आव्हानाला होकार देत पुन्हा चॅलेंज दिले होते.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटी व मच्छीमार सर्वोदय सोसायटी वरळी यांच्या विद्यमाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'तुम्ही कोणाला आव्हान देता. काही लोक रोज सकाळी गद्दार गद्दार म्हणतात. मी छोटं आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी आव्हाने स्वीकारतो,असे ते म्हणाले.

यासोबतच काही लोक म्हणाले की यायचं असेल तर वरळीमधून येऊन दाखवा. आणि हा एकनाथ शिंदे एकटाच आला. हेलिकॉप्टरने न जाता इथून रस्त्याने गेला. आम्हाला आयतं काही मिळालं नाही. शाखाप्रमुख म्हणून आम्ही काम सुरू केलं. आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत'.असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली