Eknath Shinde Press Conference 
ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळात १७ महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शेतकरी केंद्रबिंदू..."

राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या १७ महत्त्वाच्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Published by : Naresh Shende

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवला. राज्याच्या आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून ४५ हजार कोटींची तरतूद केली आहे, असं म्हणत शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांबद्दल माहिती दिली. याबाबत सीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सविस्तर तपशील पोस्ट करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

१) राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

२) तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार

३) मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.

४) १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

५) संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार

६) शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण

७) विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ, ५० कोटी भागभांडवल

८) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

९) हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना

१०) संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

११) राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

१२) ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान

१३) भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

१४) संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

१५) वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

१६) राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर

१७) श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर? PAK vs UAE सामना रद्द होण्याच्या चर्चांनंतर खळबळ

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार! एकाच वेळी संपूर्ण घर नॉमिनेट करण्याची वेळ का आली?

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य