ताज्या बातम्या

Cm Devendra Fadanvis : घटस्थापनेच्या मुहूर्तावर CM फडणवीसांनी घेतली मेट्रो 4 ची ट्रायल, शिंदेंचं खास कौतूक…

ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलीयं.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • घटस्थापनेच्या मुहूर्तावर CM फडणवीसांनी घेतली मेट्रो 4 ची ट्रायल

  • बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर

  • गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रोची ट्रायल घेतली

ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलीयं. पहिल्या ऐतिहासिक प्रवासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra fadanvis) यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

ठाण्यात आज मेट्रो 4 आणि 4 अ धावलीयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत मेट्रोची ट्रायल घेतली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही उपस्थिती होती. 2027 पर्यंत मेट्रो 4 आणि 4 अ ची 35 किमी लांबी असून या मेट्रोचं कामसंपूर्ण काम पूर्ण होणार असून 16 हजार कोटी रुपये खर्च या मेट्रोसाठी आला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलीयं.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंचं खास कौतूक

मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विशेष अभिनंदन करतो, त्यांनी मेट्रोचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्यासाठी स्वत: लक्ष घालून अनेक अडचणी सोडवल्या. अडचणी दूर करुन मोगरपाडातील जमीन डेपोसाठी मिळवून दिली. प्रताप सरनाईक यांनीही त्यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच मेट्रोला वेग आला असल्याने त्यांचं विशेष अभिनंदन करीत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. 32 स्टेशन या दोन्ही मार्गिंकांवर असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्क्यांपेक्षा पूर्ण झाला आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग 2027 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

ठाणे मेट्रोची 10 स्टेशनं कोणती?

1) कॅडबरी

2) माजीवाडा

3) कपूरबावाडी

4) मानपाडा

5) टिकूजी -नी -वाडी

6) डोंगरी पाडा

7) विजय गार्डन

8) कासरवाडावली,

9) गव्हाणपाडा

10) गायमुख

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा